उषा साठे हत्येच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने अकलूज बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

उषा साठे हत्येच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने अकलूज बंद

 उषा साठे हत्येच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने अकलूज बंद




अकलूज (कटूसत्य वृत्त):- उषा साठे हत्येच्या निषेधार्थ, बहुजन समाजाच्या वतीने, अन्याविरुद्ध  एल्गार पुकारला होता. तर योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. बंदला अकलूजकरांचा  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला तर मोर्चामध्ये बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
        माळशिरस तालुक्यातील चौंडेश्वरवाडी येथे 6 जुलै रोजी उषा साठे या महिलेची सचिन देशमुख या आरोपीने गोळी झाडून हत्या केली होती.याच्या निषेधार्थ योद्धा प्रतिष्ठानने बंद पुकारला होता, या बंदला उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला तर बहुजन समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी  तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता.सदर मोर्चा मध्ये  मोठ्या संख्येने बहुजन बांधव, वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        यावेळी दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाईंजे, योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शेखर खिलारे, प्रा.अरुण खंडागळे, मल्हारी करडे माजी उपसरपंच गारवड, नगरसेवक महेश शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष अभिजीत गायकवाड, केशव लोखंडे, कुमार लोंढे, शैलेश पोटफोडे आदींनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या.

चौकट
वेपन जप्त केली असून, आरोपीला अटक केली आहे. सॅम्पल ही मुंबई पुणे सोलापूर या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. ज्याच्या नावावर वेपन आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही फॅमिलीला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. कायदेशीर बाबीचा अभ्यास करून कारवाई केले जाईल तर जलद गतीने पाठपुरावा चालू आहे.
 संतोष वाळके
उपविभागीय पोलीस अधिकारी

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages