51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ

 51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी आणि अर्जांचे निवारण वेळेत न करता ते प्रलंबित ठेवणे सोलापूर महानगरपालिकेच्या ५१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे.

महापालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी कर्तव्यलवचिकतेचा दाखला देत या सर्वांवर थेट दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले आहेत. या धडक कारवाईमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

'माय सोलापूर' अॅपवरील हलगर्जीपणा

महापालिकेच्या 'माय सोलापूर' (My Solapur) या मोबाईल अॅपवर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारी वेळेत न सोडवल्याबद्दल २१ कर्मचाऱ्यांना एकूण ४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लोकसेवा हक्क अधिनियमाचे उल्लंघन

नागरिकांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत केलेले अर्ज वेळेत निकाली न काढता ते प्रलंबित ठेवल्याप्रकरणी २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल २५ हजार ९०० रुपयांचा सामूहिक दंड करण्यात आला आहे.

कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही

महापालिका प्रशासनाने डिजिटल प्रणालीचा वापर करून नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत. मात्र, तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामात दिरंगाई होत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर उपायुक्त सोनाली यादव यांनी ही कडक भूमिका घेतली आहे.

महापालिकेचा कडक इशारा

नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी आणि अर्ज विहित मुदतीतच निकाली निघाले पाहिजेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक सूचना महापालिका प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे आतातरी महापालिकेचा कारभार गतिमान होणार का आणि नागरिकांच्या तक्रारी वेळेत सुटणार का, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages