चपळगांव गटातील गावांसाठी हन्नुरमध्ये लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची सहविचार सभा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

चपळगांव गटातील गावांसाठी हन्नुरमध्ये लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची सहविचार सभा

 चपळगांव गटातील गावांसाठी हन्नुरमध्ये लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांची सहविचार सभा





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- आपल्या जिल्हा परिषद गटातील व गणांतील गावे स्मार्ट बनावीत.प्रत्येक खेडेगांवातील सद्यस्थिती आणि तिथे शासनाच्या योजना कितपत राबविल्या आहेत.यापुढे काय करायचे आदी प्रश्नांसाठी जिल्हा परिषदेच्या सदस्य शांभवी कल्याणशेट्टी,पंचायत समितीचे सभापती रश्मी हिप्परगी व उपसभापती सागर कल्याणशेट्टी यांच्या संकल्पनेतून चपळगाव गटातील गावांसाठी हन्नूर येथे लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची संयुक्तिक बैठक पार पडली.यामध्ये १८ गावांमधील प्रशासक सरपंच-उपसरपंच, जि.प.शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र-उपकेंद्र, आशा वर्कर्स व संबधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
             यावेळी व्यासपीठावर जि.प.सदस्या शांभवी कल्याणशेट्टी,सभापती रश्मी हिप्परगी,उपसभापती सागर कल्याणशेट्टी,पंचायत समिती सदस्य विनोद मोरे,
गटविकास अधिकारी शंकर कवितके,सहाय्यक गटविकास अधिकारी अमोल मुंडे,उप अभियंता एम.एस.उंबरजे, बाल विकास अधिकारी भोसले पाणीपुरवठा उप अभियंता व्ही.डी राठोड, गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे,विनायक तवटे,डी.जी कवडे,आरोग्य अधिकारी अश्विन करजखेडे, वित्त विभागाचे एस होणसुरे, उमेदचे केशवदास,स्वच्छ भारत मिशनचे सतीश शिंगे, प्रियंका संगमनेरकर, कार्यक्रमाधिकारी पूनम मुळे, प्रशासक सरपंच सोनाली तळवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी शांभवी कल्याणशेट्टी यांनी या सहविचार सभेचा हेतु स्पष्ट केला.यावेळी चपळगांव, हन्नुर,बऱ्हाणपुर,बावकरवाडी, चपळगांववाडी,डोंबरजवळगे,कुरनुर,सिंदखेड,मोट्याळ, किणी,काझीकणबस, किणीवाडी,सुलतानपुर, बोरेगांव,दर्शनाळ,पितापुर, नन्हेगांव,अरळी,चुंगी आदी गावातील लोकप्रतिनिधी-अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.यासमयी प्रत्येकांनी आपापल्या अडी-अडचणी,सुचना मांडल्या.

चौकट..
हन्नुर येथे आयोजित लोकप्रतिनिधी-अधिकारी-कर्मचारी यांच्या सहविचार सभेमुळे चपळगांव गटातील विवीध प्रश्नांविषयी सखोल चर्चा पार पडली.यामुळे भविष्यातील उपाययोजनांसाठी हातभार लागणार आहे.तर या उपक्रमामुळे प्रशासन-लोकप्रतिनिधी एकाच ठिकाणी एकत्रित आले.यामुळे वेळेचीदेखील बचत झाली.याच पध्दतीने तालुक्यात सगळीकडे सहविचार सभा घेणार आहोत.

सागर कल्याणशेट्टी(उपसभापती-पंचायत समिती, अक्कलकोट)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages