करमाळा (कटूसत्य वृत्त):- करमाळ्यातील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल दिंडी उत्साही वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी तसेच पालकांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भिंत चालविल्याचा प्रसंग विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर 'ज्ञानोबा माऊली तुकाराम', 'जय जय राम कृष्ण हरी' या गजरात पालखीसह बाल दिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, वारकरी आदींची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. हातात भगवे झेंडे, टाळ आणि मृदंग यांच्या साथीने विठ्ठल नामाच्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला.
या बाल दिंडीत स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पालक प्रतिनिधी गोविंद विटकर यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत दळवी, मुख्याध्यापिका धनश्री दळवी, सहशिक्षिका शिवांगी कांबळे, शुभांगी खळदकर, रोहिणी गरड, अमृता पाटील, अश्विनी झाडबुके, सविता पवार, कृष्णा पवार, संजय शिंदे, युवराज कानगुडे, गुलफाम कुरेशी तसेच सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment