हुंडाबळी व छळ खटल्यातून गुजरातच्या शेट कुटुंबाची निर्दोष मुक्तता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 16, 2026

हुंडाबळी व छळ खटल्यातून गुजरातच्या शेट कुटुंबाची निर्दोष मुक्तता

 हुंडाबळी व छळ खटल्यातून गुजरातच्या शेट कुटुंबाची निर्दोष मुक्तता




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्र. ६ यांच्या न्यायालयाने हुंडाबळी, शारीरिक व मानसिक छळ तसेच दमदाटीच्या आरोपांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या खटल्यात गुजरातमधील शेट कुटुंबातील पाच जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने १३ जुलै २०२६ रोजी हा निकाल दिला.

या प्रकरणात सत्यम महेंद्रकुमार शेट (पती), महेंद्रकुमार अमृतलाल शेट (सासरे), ज्योतीबेन महेंद्रकुमार शेट (सासू), हिरेन महेंद्रकुमार शेट (दीर) आणि मोनलबेन हिरेश शेट (जाऊ) यांच्याविरोधात सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फिर्यादी सोनाली सत्यकुमार शेट यांनी सासरच्या मंडळींकडून हुंड्याची मागणी, मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. श्रीनिवास कटकूर यांनी बाजू मांडली.

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने अभियोजनाकडे आरोपींविरुद्ध कोणताही ठोस व विश्वासार्ह पुरावा नसल्याचा युक्तिवाद केला. फिर्यादीने न्यायालयात तक्रारीवरील स्वाक्षरी मान्य केली असली, तरी तक्रारीतील मजकुराची माहिती नसल्याचे सांगितल्याकडेही बचाव पक्षाने न्यायालयाचे लक्ष वेधले.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने अभियोजन पक्ष आरोपींविरुद्धचा गुन्हा वाजवी शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २४८(१) तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम २७१(१) अन्वये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

निकालानंतर बचाव पक्षाचे विधिज्ञ ॲड. श्रीनिवास कटकूर यांनी सांगितले की, न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे दिलेला हा निर्णय सत्य आणि न्यायाच्या विजयाचे प्रतीक असून, खोट्या आरोपांमुळे त्रास सहन करणाऱ्या निर्दोष व्यक्तींना या निकालामुळे न्याय मिळाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages