सोलापूरकरांची लाडकी 'हुतात्मा एक्सप्रेस'चे रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी आणि प्रवाशांच्या गळ्यातील ताईत बनलेली 'हुतात्मा एक्सप्रेस' आज आपल्या सेवेची यशस्वी २५ वर्षे पूर्ण करून रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या खास आणि ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून सोलापूरच्या रेल्वेप्रेमींनी एकत्र येत एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
या दिमाखदार सोहळ्यासाठी हुतात्मा एक्सप्रेसच्या इंजिनला अत्यंत आकर्षक आणि सुंदर फुलांनी सजवण्यात आले होते. तसेच या गाडीचे अधिकृत बोधचिन्ह देखील विशेष रितीने सजवून त्याला नवा लूक देण्यात आला.
अन्नदात्या आणि कर्तव्यदक्षांचा सन्मान:
इंजिन चालकांच्या हस्ते केक कापला!
नेहमी पडद्यामागे राहून हजारो प्रवाशांचा प्रवास सुखकर करणाऱ्या फ्रंटलाईन रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यासाठी गाडी मार्गस्थ होण्यापूर्वी ऑन-ड्यूटी लोको पायलट (Loco Pilot) आणि असिस्टंट लोको पायलट (Assistant Loco Pilot) यांच्या हस्ते केक कापून हा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे आणि योगदानाचे कौतुक करण्याचा हा अनोखा प्रयत्न उपस्थितांचे मन जिंकून गेला.
रेल्वेप्रेमींचे मोलाचे योगदान
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी सोलापूरमधील निष्ठावंत रेल्वेप्रेमी अश्विन गोरे, पुष्कर खामीतकर, शुभंकर कुलकर्णी, नील दणके, राज म्हामणे, अनीश जाधव, अथर्व श्रीमाळ आणि प्रसन्न बाबर या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सर्व सदस्यांच्या उपस्थितीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला. सोलापूर विभागातील या अत्यंत महत्त्वाच्या आणि अभिमानाच्या रेल्वेला सन्मानित करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला, त्या सर्वांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
.png)
No comments:
Post a Comment