'आंदोलकांना घेऊन जाल तर खबरदार!'; मुंबईत तरुणीने पोलिसांची व्हॅन अडवली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

'आंदोलकांना घेऊन जाल तर खबरदार!'; मुंबईत तरुणीने पोलिसांची व्हॅन अडवली

    'आंदोलकांना घेऊन जाल तर खबरदार!'; मुंबईत तरुणीने पोलिसांची व्हॅन अडवली

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन तीव्र; शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची आंदोलकांशी संवाद साधत पाठिंब्याची ग्वाही



मुंबई (कटूसत्य वृत्त): दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत बुधवारीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहिले. चेंबूर आणि दादर परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र जमले होते. यावेळी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या व्हॅनसमोर एका तरुणीने धाडसाने उभे राहत वाहन अडविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात विद्यार्थ्यांनी निषेध आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे शिवाजी पार्ककडे मोर्चा काढत आंदोलन अधिक तीव्र केले.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांच्या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages