उमाबाई श्राविका *विद्यालयात *गुरुपौर्णिमा *मोठ्या*उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांकडून* शिक्षकांचा सन्मान*
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमेचा सण अत्यंत उत्साह पूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरेचे जतन करण्यासाठी आणि गुरु बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता सरस्वती च्या फोटोचे प्रतिमा पूजन करून करण्यात आले याप्रसंगी इयत्ता दहावी अ या वर्गातील मुलींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच इयत्ता दहावी अ च्या वर्गातील मुलांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका माधवी खोत यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद करताना सांगितले आई वडील आपल्याला जन्म देतात परंतु शिक्षक आपल्याला समाजात मानाने जगण्याचे सामर्थ्य देतात हे प्रास्ताविकेतून सांगितले. याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अश्विनी पंडित, उपमुख्याध्यापिका माधवी खोत , मार्गदर्शिका दीप्ती शहा ,पर्यवेक्षक बाळासाहेब पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना उपयोगी साहित्य व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेच्या सहशिक्षिका महाडिक मॅडम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यात आला. इयत्ता आठवीच्या वर्गशिक्षिका सोनाली उंडे व विद्यार्थी यांनी सुंदर अशी एक नाटिका सादर केली तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
तसेच या प्रसंगी बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेल्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुप कस्तुरे, राजश्री आगरखेड, मीनाक्षी बेळे, क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे, अभिनंदन उपाध्ये, यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment