स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव कॅम्पसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि. २२) त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विकासाभिमुख कार्याचा, शिस्तप्रिय व कार्यक्षम नेतृत्वाचा तसेच स्वच्छता आणि टापटीपपणाबाबतच्या त्यांच्या दृष्टिकोनाचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अजित पवार हे स्वच्छता, शिस्त आणि कार्यालयीन कामकाजातील नीटनेटकेपणाबाबत अत्यंत जागरूक होते. त्यांच्या याच कार्यपद्धतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालयातील विविध कार्यालयीन विभाग, प्रयोगशाळा आणि परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छ, सुंदर आणि सुबक परिसर राखण्याचा संकल्प केला.
या प्रसंगी माजी कुलगुरू तथा सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक प्रा. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. विजय बिरादार, प्रा. प्रदीप तपकिरे, हरीष गुरमे, अनंतराव पाटील, माणिक शिंदे, हेमंत लगदिवे, शशिकांत जगताप, विनायक पालमूर, ग्रंथपाल, गणेश घोगले, विद्यानंद बाबर, लिपिक नवनाथ भडंगे, गौरव साबळे तसेच जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment