जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रम
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथे आषाढी वारीनिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संगिनी फोरम,कुमार मेडिकलतसेच व्हेटरिनरी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या २१०० हून अधिक वारकरी भाविकांना नॅपकिन्स तसेच उपवासासाठी साबुदाणा खिचडी, चिक्की,वेफर्स,चहा आदी खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.या सेवाकार्यात वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले जात आहेत.या उपक्रमासाठी मोलाचे प्रायोजकत्व दिल्याबद्दल सौ. मनाली आशिष गांधी व्हेटरिनरी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज यांचे आयोजकांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
संगिनी फोरमच्या सदस्या स्वराली फडे,भाग्यश्री फडे,मेघना फडे, काजल खिवानसरा,सेजल दोशी, नितुजा चांकेश्वर,नम्रता दोशी व रिया दोशी यांनी या सेवा उपक्रमात आनंदाने व उत्साहाने सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.या उपक्रमाचे आयोजन संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ. भक्ती अमोल वैद्य व सचिव सौ. अर्पिता संदेश गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment