सोलापूरातील ऑर्केस्‍ट्रा बार ३१ डिसेंबरला होणार बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

सोलापूरातील ऑर्केस्‍ट्रा बार ३१ डिसेंबरला होणार बंद

सोलापूरातील ऑर्केस्‍ट्रा बार ३१ डिसेंबरला होणार बंद



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्‍यातील ऑर्केस्‍ट्रा बारवर बंदी घालण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. नव्‍या ऑर्केस्‍ट्रा बारला परवानगी देण्यात येणार नाही तर जुन्‍या बारचे परवाने नुतनीकरण करण्यात येणार नाहीत.

यामुळे सोलापुरातील सुमार २५ पेक्षा अधिक ऑर्केस्‍ट्रा बार बंद होणार आहेत. ऑर्केस्‍ट्रा बारच्‍या नावाखाली डान्‍सबार सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने राज्‍य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

२००५ साली राज्‍यात डान्‍सबार बंदी झाली. त्‍यानंतर बार मालकांनी न्‍यायालयात धाव घेतल्यानंतर काही ठिकाणी ऑर्केस्‍ट्रा बार सुरू करण्यात आले. यासाठी राज्‍य शासनाने २०१६ मध्ये कायदा केला. त्‍यानुसार ऑर्केस्‍ट्रा बारचे परवाने देण्यास सुरुवात झाली. त्‍यानंतर अनेक मुंबई, ठाण्यासह राज्‍यातील अनेक जिल्‍ह्यात ऑर्केस्‍ट्रा बार सुरू झाले. परंतु या ऑर्केस्‍ट्रा बारच्‍या नावाखाली पुन्‍हा डान्‍सबार सुरू असल्याचा प्रकार वेळोवेळी समोर येत आहे. त्‍यामुळे राज्‍य शासनाने हे ऑर्केस्‍ट्रा बारच बंद करण्याचा निर्णय घेतला.

गृहविभागाने २७ जुलै रोजी याबाबतचा अध्यादेश काढला. त्‍यानुसार नवीन ऑर्केस्‍ट्रा बारला परवानगी देण्यात येऊ नये, तसेच जुन्‍या ऑर्केस्‍ट्रा बारचे परवाने नूतनीकरण करण्यात येऊ नयेत, असे आदेश दिले आहेत. त्‍यामुळे राज्‍यातील सर्व ऑर्केस्‍ट्रा बार बंद पडणार आहेत. सोलापुरात सध्या शहरात ११ तर ग्रामीण हद्दीत ८ असे १९ ऑर्केस्‍ट्रा बार सुरू आहेत. त्‍याचबरोबर परवाने न घेता अवैधरित्‍या ऑर्केस्‍ट्रा बारही सुरू आहेत. परवाने असलेल्या ऑर्केस्‍ट्रा बारची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. त्‍यानंतर नूतनीकरण करण्यात येणार नसल्याने हे ऑर्केस्‍ट्रा बारही बंद होणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages