दिल्लीत उद्रेक! नीट पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व एल्गार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

दिल्लीत उद्रेक! नीट पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व एल्गार

 दिल्लीत उद्रेक! नीट पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व एल्गार






थेट संसदेवर धडक, आंदोलकांवर लाठीचार्ज व अश्रूधूरांचा वापर, PM मोदी पडले बाहेर
सरकारचा चर्चेचा केवळ फार्स! नड्डांनी दहा मिनिटांत गुंडाळली बैठक

नवी दिल्ली (वृत्त सेवा):- अवघ्या दोन महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या काँक्रोज जनता पार्टीची रस्त्यावरची ताकद आणि तरुणाईचा संताप सोमवारी देशाने पाहिला. नीट पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारक सोनम वांगचूक यांचं उपोषण सुरु होतं.

मात्र सरकारने 20 व्या दिवशी त्यांना बळजबरीने रुग्णालयात नेलं आणि आंदोलकांमध्ये संतापाची लाट पसरली. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 20 जुलैच्या संसदेवरील नियोजित धडक मोर्चात सहभागी होण्याचं देशभरात आवाहन करण्यात आलं. आणि त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलकांवर संसदेकडे कुच करण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला.

त्यामुळे बिथरलेल्या आंदोलकांनी आणखीनच त्वेशानं संसदेवर धडक देण्याची तय़ारी सुरू केली. मात्र ठिकठिकाणी पोलिसांनी बॅरीकेड्स लावून आंदोलकांना संसदेपर्यंत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांची संख्या वाढतच गेली आणि पोलिसांना नियंत्रण करणं आणखीनच कठीण झालं. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराचे नळकांडे फोडून मारा केला. मात्र तरीही आंदोलकांनी संसद परिसरात धडक दिली. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांशी सरकार संवाद का साधत नाही असा सवाल विरोधकांनी केला.

पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. त्यामुळे संसदेच्या बाहेर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संसदेबाहेरील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून लाठीचार्ज केला जात आहे, अश्रुधुरांचा वापर केला पण विद्यार्थी एक इंचही मागे हटायला तयार नाहीत. शिक्षणमंत्र्यांनी राजीनमा द्यावा, ही मागणी जोर धरल्याची दिसत आहे.

जंतर-मंतरवरून संसदेकडे निघालेल्या या भव्य मोर्चावर पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या कडक कारवाईत आणि वाढत्या डिहायड्रेशनमुळे अनेक आंदोलक विद्यार्थी जागीच बेशुद्ध पडले. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आंदोलनाला विरोधकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आम आदमी पक्षाचे बडे नेते मनीष सिसोदिया, अतिशी आणि काँग्रेसचे कपिल सिब्बल हे स्वतः रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना पाठिंबा देत होते, मात्र पोलिसांनी त्यांनाही पुढे जाण्यापासून रोखले. दुसरीकडे, सत्ताधारी खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया देत, "संसदेत गोंधळ घालून प्रश्न सुटणार नाहीत, शांततेत चर्चा झाली पाहिजे," असे वक्तव्य केले आहे.

कमांडो आणि वॉटर कॅनन तैनात

संसदेवर काढण्यात आलेला हा मोर्चा रोखण्यासाठी प्रशासनाकडून आधीच मोठी तयारी करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी वॉटर कॅनन आणि बंदूकधारी कमांडो तैनात केले. सरकार चर्चेचा मार्ग टाळून आंदोलकांना बळाचा वापर करून पांगवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केला.

पोलिसांनी लाठ्या-काठ्यांचा वापर केला आणि अश्रूधूर सोडला, तरीही आंदोलक आणि विद्यार्थी इंचभरही मागे हटायला तयार नाहीत. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन घरी जावे, अशा जोरदार घोषणांनी संसदेचा परिसर दुमदुमून गेला आहे. गेली दोन महिने नीट घोटाळ्यावरून देशभरात असंतोष पसरला असताना सरकार कोणताही प्रतिसाद देत नाही, त्यामुळे देशभरातली तरुणाई दिल्लीत रस्त्यावर उतरली आहे.

संसदेच्या आत शांतता, बाहेर विद्यार्थ्यांचा आक्रोश

एककीकडे संसदेच्या आत अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत होते, तर दुसरीकडे संसदेच्या अवघ्या काही अंतरावर तरुणांवर लाठ्या चालवल्या जात होत्या. गेल्या २२-२३ दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत हे विद्यार्थी शांततेत लढा देत होते, परंतु सरकारने चर्चेचा मार्ग टाळल्यामुळे आज हा असंतोष रस्त्यावर फुटल्याची जोरदार टीका करण्यात येत आहे.

आंदोलकांची वाढती संख्या आणि थेट त्यांनी संसदेच्या परिसरातच धडक दिल्यामुळे सरकारला अखेर आंदोलनाची दखल घ्यावी लागली. आणि त्यामुळे सरकारनं केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना सीजेपीशी चर्चा करण्याचं निमंत्रण दिलं. या बैठकीत सीजेपीनं तीन मागण्या ठेवल्य़ा या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका सीजेपीच्या शिष्टमंडळानं घेतलीय.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आवाहनला प्रतिसाद देत दिल्लीत जेनझी तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर दाखल झाला आहे. संसदेच्या दिशने निघाणाऱ्या नियोजित मोर्चात सहभागी होण्यासाठी हे तरुण दिल्लीत दाखल झाले आहेत.

लाखोंच्या संख्येन हे लोक दिल्लीच्या रस्त्यावर दिसून येत आहेत. त्यातच आता सरकारनं हे आंदोलन चिरडण्याचा विडा उचलला असल्याचा आरोप कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी केला आहे. कारण सरकारनं केवळ १० मिनिटांचा चर्चेचा फार्स दाखवला तर दुसरीकडं सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आता या आंदोलनाचं काय होणार? याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

अभिजीत दिपकेंना घेतलं ताब्यात

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी हा दावा केला आहे. पण पोलीस दिपकेंना नेमकं कुठे घेऊन गेले? हे अद्याप कळू शकलेलं नाही. याबाबत पोलिसांकडूनही कुठलीही अपडेट अद्याप देण्यात आलेली नाही.

सरकारचा चर्चेचा केवळ फार्स

दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांबाबत चर्चेसाठी सरकारनं सकाळी सीजेपीच्या आंदोलकांना निमंत्रिण दिलं होतं. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा या आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करणार होते. या चर्चेसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते आणि अभिजीत दिपकेंचे सहकारी अशुतोष रांका आणि सौरव दास यांनी उपस्थिती लावली. नड्डा यांच्या भेटीसाठी या दोघांना तब्बल २ तास वाट पाहावी लागली. पण भेटीनंतर केवळ १० मिनिटांतच त्यांच्यातील चर्चा संपली, अशी माहिती या दोघांनी दिली. पण या चर्चेदरम्यान अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं एकीकडं आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या दोन प्रमुख आंदोलकांना सरकारनं चर्चेसाठी बोलावलं आणि दुसरीकडं आंदोलनातील महत्वाची तीसरी व्यक्ती असलेल्या अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आंदोलकांशी चर्चेचा सरकारचा केवळ फार्सच होता की काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

धर्मेंद्र प्रधान अमित शहांच्या भेटीसाठी

दरम्यान, सीजेपीच्या मोर्चाला तरुणांची वाढती गर्दी लक्षात घेता दुसरीकडं ज्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन सुरु आहे, ते केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी गेले आहेत. या भेटीमध्ये ते आपला राजीनामा सुपूर्द करतात का? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. पण अद्याप प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पंतप्रधान संसद भवनातून पडले बाहेर

आंदोलन तीव्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या ताफ्यासह संसद भवनातून बाहेर पडल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. पीटीआयने याबाबतचा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. आंदोलकांच्या वाढत्या संख्येनंतर संसद परिसर आणि जंतर मंतर परिसरात छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलन

आजपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. दरम्यान, अधिवेशन सुरु होताच विरोधकांनी नीटपेपरफुटी आणि राम मंदिर देणगी चोरीवरुन सभागृहात गोंधळ घातला. यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशन स्थगित केले. लोकसभा पाचवेळा तर राज्यसभेचे कामकाज चारवेळा स्थगित करण्यात आले. दरम्यान, अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी यांच्या ५६ वर्षीय तरुण म्हणत टीका केली. दुसरीकडे आंदोलकांवर होणाऱ्या लाठीचार्जचा मल्लिकार्जुन खरगे यांनी निषेध करत, लाठीचार्ज योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मुळात सीजेपीचं आंदोलन तब्बल महिना भरापासून सुरू आहे. मात्र सरकारनं कोणताही चर्चेचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर वांगचूक उपोषणाला बसले आणि त्यांनी तब्बल वीस दिवस उपोषण केल्यानंतरही सरकारनं चर्चेदी दारं उघडली नाही. उलट त्यांना थेट आंदोलन स्थळावरून उचलून नेण्यात आलं. त्यामुळे आक्रोश वाढत गेला आणि आंदोलनाची धग वाढली. आता हे आंदोलन सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेर गेल्याचं दिसतंय. त्यामुळे सीजेपीच्या सर्व मागण्या मान्य होणार का? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय.

चौकट-
सीजेपीच्या 3 मागण्या कोणत्या?

1) सोनम वांगचुक यांची तातडीनं सुटका करावी

आणि वांगचुक यांना व्हिडिओ बनवण्याची परवानगी द्यावी

२) धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा

३) आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी नुकसान भरपाई द्यावी



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages