श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

 श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापनदिन व गुरुपौर्णिमा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३९ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दि. १९ जुलै रोजी रविवार सायंकाळी ६.३० वा. विरक्त मठाचे श्री म.नि.प्र. पूज्य बसवलिंग महास्वामीजी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी प.पू.श्री मोहन पुजारी, श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी वे.शा.सं.श्री अण्णू महाराज, साई ग्रुप, साईसुश्रुत कन्सट्रक्शन, पुणे संस्थापक अध्यक्ष- अरुण आडकर, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, शुभम नांगरे, पालखी संयोजक, नाशिक, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश पवार, चॅलेंजर सपोर्टचे अतिश  शहा, आरती शहा, चंद्रशेखर गायकवाड, मनिषा गायकवाड, रामदास तांबे, उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक सतीश रणवरे, आय.एस.ओ. प्रमाणपत्र अधिकारी ओंकार पत्की, यशवंत पत्की आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन पहिल्या पुष्पाचे मोठ्या उत्साहात गंगा आरती ने शानदार उद्घाटन संपन्न झाले.* 

दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन, मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जेष्ठ ख्यातनाम गायिका उषाताई मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा ‘रंग उषेचे, कार्यक्रम सादर करण्यात आला. यांच्या समवेत नेहा चिपळूणकर, हेमंत वाळूंजकर, रसिका गानू, धवल चांदवडकर, विवेक परांजपे, नरेंद्र चिपळूणकर, राजेंद्र साळुंके, नितीन शिंदे, रोहित जाधव, आनंद घोरारे, प्राजक्ता मोडक व अॅंकर प्रवीण जोशी यांनी साथ दिली. या सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास आय.एस.ओ. प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते यथासांग मंत्र पठणाने श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

उषा मंगेशकर यांच्या रंग उषेचे या कार्यक्रमात श्री गणेश वंदना, अभंग वाणी ज्ञानेश्वरांची, असा हा बेभान वारा..!, आदी मराठमोळ्या गाण्या बरोबरोच हिंदी सदाबहार गाण्यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. मंडळाच्या ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाचा शानदार शुभारंभास श्रोतेगणांची प्रचंड गर्दी झालेली होती. यावेळी कलाकारांच सत्कार सोहळा संपन्न झाला. उषाताई मंगेशकर यांचा सत्कार न्यासाचे जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले, स्मिता कदम, पल्लवी कदम, उज्वला भोसले, संगीता भोसले, रूपा पवार, स्वप्ना माने, कविता वाकडे, सुवर्णा घाडगे, राजश्री माने, क्रांती वाकडे, धनश्री पाटील, सरोजनी मोरे, दिव्या मोरे, कल्पना मोरे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, शुभम नांगरे, पालखी संयोजक, नाशिक, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, मनोज निकम, प्रा. शरणप्पा आचलेर, प्रवीण देशमुख, शितल फुटाणे, सुमित घाटगे, रोहित खोबरे, अरविंद शिंदे, सौरभ मोरे, शिवराज स्वामी, राहुल गांधी, तम्मा भिमपुरे, नीलकंठ कापसे, निखील पाटील, बाळासाहेब कुलकर्णी बबलादकर, मैनुद्दीन कोरबू, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, शहाजीबापू यादव, महादेव अनगले,  सतीश महिंद्रकर, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, महांतेश स्वामी, संजय गोंडाळ, प्रसाद मोरे, संजय गोंडाळ, केदार तोडकर, वैभव मोरे, फहीम पिरजादे, केदार तोडकर, योगेश पवार, आकाश सूर्यवंशी, विनायक भोसले, भरत राजेगावकर, मल्लिकार्जुन बिराजदार, प्रशांत साठे, वासू कडबगांवकर, गोविंदराव शिंदे, प्रा. मनोज जगताप, ज्ञानेश्वर भोसले, श्रीधर गुरव, अश्पाक काझी, सर्फराज शेख, आकाश गडकरी, सिद्धाराम टाके, बालाजी पाटील, प्रीतेश किलजे, विलास राठोड, रमेश केत, संदीप सुरवसे, अप्पा गवळी, आबा सूर्यवंशी, बंडू बंडगर, शुभम सावंत, किरण साठे, सागर याळवार, विजय इंगळे, अमर मसरे, सोनू पवार, सौरभ माने, रमेश हळसंगी, संतोष माने, राहुल इंडे, असद फुलारी, समर्थ चव्हाण, सुमित कल्याणी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठलराव रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार मानले.  

*गुणीजन गौरव :* अॅड.विक्रम येडूर, सोलापूर, इरन्ना सतीश इंडे (एस.टी. चालक), बँक अधिकारीम इरेश बागेवाडी, शिक्षक शिवशंकर बिराजदार यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 
*गुणवंत विद्यार्थी गौरव :* तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

सोमवार दि. २० जुलै आज रोजी सायंकाळी ७.१५ ते रात्रौ ९.३० पर्यंत कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन यांचा “संगीत संजे” हा कार्यक्रम सादर होणार आहे. 

चौकट :
राज्य मंत्री मंडळासह, मुंबई महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्याकडून शुभ संदेश - श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाच्या ३९ वा. वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवाच्या कार्यक्रमास शुभ संदेशाद्वारे शुभेच्छा दिले आहेत.

चौकट :
*भक्ती रन टी-शर्ट चे अनावरण -*
२६ जुलै रोजी रविवार पहाटे ५.३० ते ९.३० वा पर्यंत श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), व चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “आरोग्य ते अध्यात्म” हा प्रेरणादायी संदेश देणारी ही “भक्ती रन” स्पर्धा रविवार दि. २६ जुलै २०२६ रोजी अक्कलकोटच्या पावन भूमीत आयोजित करण्यात आली असून, शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्मिक उन्नती आणि भक्तीमय वातावरणाचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. या भक्ती रन टी-शर्ट चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages