भाजपाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

भाजपाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची नियुक्ती

 भाजपाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची नियुक्ती





करमाळा (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य असलेले गणेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
नियुक्तीचे अधिकृत पत्र माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते गणेश चिवटे यांनी स्वीकारले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गणेश चिवटे यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना सांगितले की, "गणेश चिवटे हे अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान, अभ्यासू आणि संघटनप्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत संघटनात्मक कामात वेगळा ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी उल्लेखनीय विजय मिळवला असून त्यांच्या संघटन कौशल्याचा निश्चितच पक्षविस्तारासाठी मोठा लाभ होईल असे सांगितले, 
या नियुक्तीनंतर भावना व्यक्त करताना गणेश चिवटे म्हणाले, की "गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी माझ्यावर सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे. माझे मार्गदर्शक गुरुवर्य माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर स्वीकारण्याचा योग लाभणे हे माझे भाग्य आहे."
ते पुढे म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माझे मार्गदर्शक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर पश्चिम ग्रामीण जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पूर्ण क्षमतेने कार्य करेन. बूथ सक्षमीकरण, नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यास प्राधान्याने काम करत राहील असे सांगीतले, 
गणेश चिवटे यांच्या नियुक्तीमुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण सोलापूर पश्चिम ग्रामीण भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages