अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात अभिवादन कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात अभिवादन कार्यक्रम

अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात अभिवादन कार्यक्रम



पंढरपूर (कटूसत्य वृत्त):राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. पक्षाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

याप्रसंगी अनिल नागटिळक यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या राजकीय, सामाजिक व विकासात्मक योगदानाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या नेतृत्वातून पक्षाला मिळालेली दिशा व कार्यकर्त्यांना मिळालेले बळ याविषयी त्यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी बापू साळुंखे, संचालक रमेश पाटील, अर्जुन बापू जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages