आरोग्याची वारी पंढरीच्या दारी २० हजार वारकऱ्यांना रुग्णसेवेचा लाभ- राजकुमार हिवरकर पाटील
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची ही भावना शिवसेना नेते राजकुमार हिवरकर पाटील यांनी मनात ठेवून तसेच वारीतील आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्यासाठी वारकऱ्यांना मोफत गुणवंत पूर्ण आरोग्यसेवा पुरवण्याच्या हेतूने शिवसेना भवन नातेपुते येथे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी राजकुमार हिवरकर पाटील यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राबविण्यात आलेल्या आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या दवाखान्याच्या माध्यमातून २० हजार वारकऱ्यांनी रुग्णसेवेचा मोफत लाभ घेतला.कराड येथील सह्याद्री हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालय नातेपुते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी वारकऱ्यांना आयुर्वेदिक सेवा, रक्तदाब, शुगर तपासणी, औषधोपचार, पायाचे मोफत मसाज पुरविण्यात आली. रणजीत सामाजिक बहुउद्देशीय संस्था, राजगड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व राजगड नॉलेज सिटी नातेपुते यांच्या संयुक्त विद्यमाने वारकऱ्यांसाठी बिस्किट, उपवासासाठी केळीचे वाटप करण्यात आले. शिरोळ ता. कोल्हापूर येथील धनगर समाज बांधवांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील पोवाडा सादर केला त्यास माऊली भक्तांनी दाद दिली. वरील उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद लाभला असून रुग्णांची सेवा हीच आमच्यासाठी विठुरायाची सेवा व प्रत्येक वारकऱ्यास मिळावा आरोग्याचा चांगला ठेवा ही अशा शिवसेनेचे राजकुमार हिवरकर पाटील यांनी व्यक्त करून पांडुरंगास वारकऱ्याप्रती चांगल्या आरोग्याची प्रार्थना केली.शिवसेना नेते राजकुमार हिवरकर पाटील यांच्या आयोजनाला डॉ. संतोष खडतरे, डॉ. शेंडगे, जावेद मुलाणी, डॉ. आंधळकर यांचे सहकार्य लाभले. रणजीत हिवरकर पाटील, महेश जमाले, सह्याद्री हॉस्पिटलचे निलेश कदम, शंकरराव शिंगाडे, तुषार मेटकरी, संग्राम हिवरकर पाटील, विलास कुऱ्हाडे, सोमा काळे, दत्ता बोडरे, वैष्णवी झगडे, भाजपचे मनोज जाधव, सुनील गोरे, तेजस गोरे, सागर कापरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
.jpg)
No comments:
Post a Comment