टेंभुर्णीत महाविकास आघाडीचे त विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध
टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, तसेच दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, अभिजीत दिपके आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने टेंभुर्णी येथे निवेदन देऊन निषेध करण्यात आला
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), संभाजी ब्रिगेड आणि वडार परिवर्तन सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे ए पी आय संदेश बावकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात, विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, NEET पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध नोंदवत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
निषेध दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत, देशातील विद्यार्थी, युवक आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशारा दिला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) माढा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील वरवडेकर , शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माढा तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, माढा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय पाटील, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, वडार परिवर्तन सेनेचे अध्यक्ष राजू (बाबा)धोत्रे, काँग्रेस प्रदेश सचिव भीमराव बंडगर, शिवसेना विभागप्रमुख बाबा चंदनकर, शिवसेना शहरप्रमुख संतोष खैरमोडे, काँग्रेस अध्यक्ष हेमंत देशमुख, युवा सेना समन्वयक (सोलापूर) किशोर देशमुख, काँग्रेसचे मुकुंद ननवरे, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जमीर काझी, टेंभुर्णी शहर शिवसेना उपप्रमुख प्रशांत सोनवणे, काँग्रेस तालुका सदस्य काका डावरे, शिवसेना शहर संघटक दादा कोळपे, शिवसेना कामगार आघाडी तालुका अध्यक्ष अजय गायकवाड, काँग्रेसचे संजय ताकतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब गुणेर, शिवाजी मासुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment