विक्रमी १७० विषयांना सर्वसाधारण सभेची मंजुरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 22, 2026

विक्रमी १७० विषयांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

 विक्रमी १७० विषयांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

           महापौर कोंड्याल व सभागृहनेते काळे यांचा सत्कार




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाशी तसेच नागरिकांच्या विविध प्रश्नांशी संबंधित तब्बल १७० विषयांना मंजुरी देण्यात आली. एका बैठकीत विक्रमी संख्येने विषयांना मान्यता मिळाल्याने ही सभा विशेष ठरली. विविध विकासकामे, नागरी सुविधा, प्रशासनिक निर्णय आणि जनहिताच्या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेत सभेने महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदविली.

या विक्रमी कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महापौर श्री विनायक कोंड्याल आणि सभागृहनेते श्री नरेंद्रजी काळे यांचा उपस्थित नगरसेवकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करत शहराच्या विकासासाठी अशाच प्रकारे लोकाभिमुख आणि गतिमान निर्णय प्रक्रियेला पुढेही चालना देण्याचा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी नगरसेवक विनोद भोसले, गौतम कसबे, अक्षय अंजीखाने, सिद्धेश्वर कमटम, भारतसिंग बडूरवाले, प्रशांत पल्ली, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, राजश्री दोडमणी, श्रीदेवी पुलारी, श्रद्धा पवार, तसेच किरण पवार, अक्षय वाकसे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी महापौर आणि सभागृहनेते यांचे अभिनंदन करत, सर्वपक्षीय सहकार्य आणि सकारात्मक चर्चेमुळे मोठ्या प्रमाणावर विषयांना मंजुरी मिळाल्याचे सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध निर्णयांना गती मिळाल्याने आगामी काळात अनेक विकासकामे वेगाने मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages