विद्यार्थ्यांवरील दडपशाहीविरोधात; महाराष्ट्र बंदची घोषणा
प्रकाश आंबेडकर आक्रमक; महाराष्ट्र बंदने सरकारला घेरण्याची तयारी
मुंबई (कटूसत्य वृत्त):- दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वणवा आता महाराष्ट्रात देखील पेटणार असल्याची चिन्हे आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी (ता. 23) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा निषेधासाठी हा बंद असणार असल्याचे 'वंचित बहुजन आघाडी'चे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी, विद्यार्थी संघटना, सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांना आवाहन करत, शांततेच्या मार्गाने एकत्र येऊन 23 जुलैचा 'महाराष्ट्र बंद' यशस्वी करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात तब्बल 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. यातच सर्वोच्च न्यायालयाने सूर्य कांत यांनी एका याचिकेत बेरोजगार युवकांचा काॅक्रेज म्हटले. यातून काॅक्रेज जनता पक्षाचा जन्म झाला. या पक्षाने पहिले आंदोलन नीट पेपरफुटी विरोधात दिल्लीत आंदोलन पुकराले.
विद्यार्थी आंदोलकांना अमानुष मारहाण
ससंद अधिवेशन काळात या आंदोलनाचे रूपांतर काल मोर्चात झाले. या मोर्चाला रोखताना, दिल्ली पोलिसांनी थेट आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकाराच्या चित्रफिती समाज माध्यमांवर आजही व्हायरल होत आहे. पोलिसांनी लाठीचार्जमधून, मुलीसुद्धा वाचलेल्या दिसत नाहीत.
चौकट-
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद
या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून, देशभरात संतापाची लाट आहे. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. यातच श्रीराम मंदिरातील देणगी चोरीचा मुद्दा देखील गाजतो आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेने यावरून महाराष्ट्रात रान पेटवले आहे.
चौकट-
गुरूवारी महाराष्ट्र बंद
आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरूवारी (ता. 23) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तत्पूर्वी वंचितने ठिकठिकाणी आंदोलन करत दिल्लीतील या घटनेचा निषेध केला आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः बंदची हाक दिल्याने महाराष्ट्रात देखील केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारविरोधात आंदोलनाची धार वाढणार असल्याचे दिसते.

No comments:
Post a Comment