श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव पुष्प दुसरे
गायक राजेश कृष्णन यांच्या ‘संगित संजे’ या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- श्री गणेश वंदना..!, यारू कनली- कन नोडू ...!, उशिरे....! नुरुवे जन्मकु, गितांजली या कन्नड रोमांचक अशा एक ना अनेक कन्नड भावगत, भक्तीगीत व चित्रपट गीतांनी ख्यातनाम गायक राजेश कृष्णन यांच्या ‘संगित संजे’ या सदाबहार कार्यक्रमाने श्रोते भारावले होते. या कार्यक्रमास श्रोत्यांनी प्रचंड गर्दी केलेली होती. अनेकांनी उभे राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.*
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, सोमवार दि. २० जुलै रोजी सायंकाळी ७.वा.१५ मी सादरकर्ते कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व प्रसिध्द निवेदिका प्रतिभा, गायक साक्षी, नदीर बानू, हर्षवर्धन आणि सहकारी बेंगळूर यांचा ‘संगीत संजे’ ह्या कन्नड कार्यक्रमाने दुसरे पुष्प संपन्न झाले.
दरम्यान या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन म.नि.प्र. अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजी विरक्त मठ (तुप्पीन मठ) नागणसूर, अंजलीताई बाजारमठ, नगराध्यक्षा, मैंदर्गी नगरपरिषद, सुरेश नागूर, उपनगराध्यक्षा, मैंदर्गी नगरपरिषद, ऋतुराज उर्फ बंटी राठोड, उपनगराध्यक्ष, रश्मीताई सागर हिप्परगी, सभापती पंचायत समिती, सागर कल्याणशेट्टी, उपसभापती, पंचायत समिती, डॉ. विवेक करपे, सोलापूर, सिद्धाराम पाटील, संपादक, डॉ. अक्षय हणमशेट्टी सोलापूर, डॉ. बसवराज पाटील, मैंदर्गी, विकास बुळ्ळा, जि.प. सदस्य, मल्लिकार्जुन आळगी, मैंदर्गीचे नगरसेविका सपना मोरे, रोहिणी निंबाळ, शिवम्मा बमनळ्ळी, अप्पू पराणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी तालुक्यातील तोळणूर येथील अंध गायक रेवणसिद्ध फुलारी यांनी आपली कला सादर केली. याबरोबर सोलापूर येथील इम्पॅक्ट मोशन सोलापूर यांचे कलाकार श्रीनिवास कुणी, प्रसाद लिमये, ओंकार अलगडे, गौरव मोरे, गणेश निंबाळे, अजिंक्य सातपुते, विशाल कुलकर्णी, कौस्तुभ बारगळे यांनी गणपती वर्गणी सोलापूर याचे सादरीकरण अस्सल सोलापुरी भाषेत केले. या कलाकारांचा देखील सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी मल्लप्पा बंडेप्पा जीगजंबगी, सचिन म्हेत्रे, पत्रकार, चपळगाव, नितीन शिंदे, लक्ष्मण म्हेत्रे सह शिक्षक सातनदुधनी यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ७ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, कोमल क्षीरसागर, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, राजेंद्र लिंबीतोटे, संतोष भोसले, अशोकराव उटगे, ओंकारेश्वर उटगे, अरविंद शिंदे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment