राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, July 6, 2026

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

  राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

 



        पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- केरळ व तामिळनाडूचे राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर व त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे   दर्शन घेतले.

     यावेळी मंदिर समितीच्या वतीने  मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते राज्यपाल राजेंद्र आर्लेकर  यांचा सपत्नीक शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.   

          यावेळी ,मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरेज्ञानेश्वर महाराज जळगावकरजिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीसहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळेमंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच मान्यवर उपस्थित होते.

            तत्पूर्वी राज्यपाल  राजेंद्र आर्लेकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन माहिती घेतली. यावेळी मंदिर समितीचे सहा अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी  मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्या अंतर्गत करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या  कामांची माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages