सहकार महर्षि कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२६-२७ चे मील रोलर पूजन संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 9, 2026

सहकार महर्षि कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२६-२७ चे मील रोलर पूजन संपन्न

 सहकार महर्षि कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२६-२७ चे मील रोलर पूजन संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये, गळीत हंगाम २०२६-२७ चे मील रोलरचे पूजन बुधवार दि.०८/०७/२०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव रामचंद्र माने-देशमुख यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
       कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर आहे.
        कारखान्याने गत हंगाम २०२५-२६ मधील सर्व ऊस पुरवठादार शेतक-यांची ऊस बीले, तोडणी वाहतूक बीले अदा केली आहेत.
        सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, रावसाहेब मगर, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, जयदिप एकतपुरे, सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटीचे संचालक पांडूरंग एकतपुरे, श्रीकांत बोडके, दत्तात्रय मगर, अशोक पताळे तसेच कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख, माजी संचालक भिमराव काळे, भारत फुले, शिवाजी सिद, विजय माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, कार्यकारी संचालक सुहास यादव, सर्व खातेप्रमुख, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages