शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा 56 वा वाढदिवस शहरातील 56 समस्याने साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 23, 2026

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा 56 वा वाढदिवस शहरातील 56 समस्याने साजरा

 शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा 56 वा वाढदिवस शहरातील 56 समस्याने साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची 56 वा वाढदिवस सोलापूर शहरातील विकासाचे रखडलेले 56 समस्यांचे फलक धरून केक कापून प्रतिकात्मक वाढदिवस साजरी करण्यात आले.
 यावेळी सर्व शिवसैनिकांनी भ्रष्टाचारी भाजपाचा धिक्कार असो,गुंडगिरी पालकमंत्र्यांना पाठीशी घालणारा मुख्यमंत्र्याचे धिक्कार असो,लबाड मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो,शिवसेना जिंदाबाद, उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, सोलापुरातील भाजपा नगरसेवक आमदारांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.
     सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण व महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात विष्णू कारमपुरी,अतुल भंवर, रमेश चौगुले, सुरेश जगताप, राजाभाऊ कुसेकर,दीपक दुधाळे, सिद्धनाथ देसाई,शिवा ढोकळे,रमेश रासमल,विशाल सोरेगावकर,संदीप बेळमकर, जयप्रकाश बेळमकर,संताजी भोळे, रमेश चौगुले,अनिल दंडगुळे,जर्गीस मुल्ला, चंद्रकांत मानवी,रवी डोके,मारुती खानापुरे,अजय मळगे,सदाशिव सलगर, प्रसाद जगताप,राम वाकसे, तुषार अवताडे,समर्थ गायकवाड,राजेश मेनगुळे,वंजार शेख,विठ्ठल कुराडकर,अंबादास चव्हाण,निरंजन बोध्दुल, दत्तात्रय रुचनभैरे, बाळासाहेब गायकवाड, दिनेश चव्हाण,रेखा आडकी,गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा,पप्पू शेख यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages