उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 उजनीतून भीमा नदीत 30 हजार क्युसेकचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेतकऱ्यांसाठी एक दिलासादाक बातमी समोर आली आहे. उजनी धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरु झाली आहे. उजनी धरण 98 टक्के भरले आहे. पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरण 98 टक्के भरले आहे.

उजनी धरणातून सध्या भीमा नदीत 30 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

उजनी धरणात तब्बल 65 हजार क्युसिक विसर्गाने पाणी जमा होत आहे

अजूनही उजनी धरणात तब्बल 65 हजार क्युसिक विसर्गाने पाणी जमा होत असल्याने भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. विशेषतः पंढरपूर मध्ये अजूनही आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असून हे भाविक चंद्रभागा स्नानासाठी जात असल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे. उजनी धरणातून सोडण्यात येत असलेला हा पाण्याचा विसर्ग उद्यापर्यंत पंढरपूर मध्ये पोहोचणार असून चंद्रभागेचे वाळवंट पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठी स्पीकर वरून चंद्रभागेत न जाण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली आहे.

वारकरी आणि भाविकांना रात्री तसेच पहाटे नदीपात्रात जाणे टाळावे, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

सोलापूर जिल्ह्याची वरददायीनी म्हणून ओळख असलेले उजनी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा होतोय. धरण 100 टक्के भरण्याकडे वाटचाल करतं असताना प्रशासनाने खबरदारी म्हणून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. उजनी धरणातून सध्या 30 हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रात्री 8.30 वाजल्यानंतर विसर्ग वाढवून 30 हजार क्यूसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा (चंद्रभागा) नदीची पातळी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी वारकरी आणि भाविकांना रात्री तसेच पहाटे नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रक्षाळपूजेपर्यंत पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी राहणार असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरण 98 टक्के भरले असून धरणातून भीमा नदीत पंचवीस हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही उजनी धरणात तब्बल 65 हजार क्युसिक विसर्गाने पाणी जमा होत असल्याने भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. विशेषतः पंढरपूर मध्ये अजूनही आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असून हे भाविक चंद्रभागा स्नानासाठी जात असल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages