ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीची स्वतंत्र चौकशी करा; आयुक्त तु काराम मुंढे यांच्याकडे रोहित पवार यांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीची स्वतंत्र चौकशी करा; आयुक्त तु काराम मुंढे यांच्याकडे रोहित पवार यांची मागणी

 ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटीची स्वतंत्र चौकशी करा; आयुक्त तु काराम मुंढे यांच्याकडे रोहित पवार यांची मागणी




मुंबई (कटूसत्य वृत्त):- औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि कालबद्ध चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी आ. रोहित पवार यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली. यावेळी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर चर्चा केली आणि निवेदन सादर केले.

आ.रोहित पवार यांनी सांगितले की, ड्रग इन्स्पेक्टर भरती प्रक्रियेबाबत अनेक गंभीर शंका उपस्थित होत असून, या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि निश्चित कालमर्यादेत चौकशी होणे अत्यावश्यक आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनीही परीक्षेतील गैरव्यवहाराची माहिती आयुक्तांसमोर मांडत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

बैठकीदरम्यान आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. हा विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अखत्यारित येत असल्याने या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आयोगाकडे सुपूर्द करण्यात येतील आणि आयोग याबाबत योग्य ती कार्यवाही करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

आ.रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, हीच भूमिका असून, या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी आणि दोषींना शिक्षा होण्यासाठी ते विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभे राहतील. राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ड्रग इन्स्पेक्टर पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता MPSC या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि पुढील कार्यवाही काय होते, याकडे विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages