अकलूज येथील कोहिनूर आईस्क्रीम चौकशीच्या जाळ्यात
अकलूज (विलास गायकवाड):- अकलूज येथील सुप्रसिद्ध कोहिनूर आईस्क्रीम दुकानाची अन्न व औषध प्रशासन विभाग सोलापूर यांनी तपासणी केली असून,कार्यशाळेच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्नसुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांनी सांगितले आहे.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. तांबोळी डेअरी प्रॉडक्ट, आनंदनगर अकलूज, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर व कोहिनूर आईस्क्रीम गांधी चौक अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, या दोन्ही आस्थापनांची लेखी तक्रारीवरून,विश्लेषणासाठी अन्न नमुने घेण्यात आलेले आहेत. अन्न नमुने यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पुढील कारवाई घेण्यात येईल तसेच तपासणीच्या अनुषंगे कारवाई सुरू असल्याचे अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर अन्नसुरक्षा अधिकारी यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
दिनांक 23.04.2026 रोजी दुपारी 12.45 वा.दरम्यान, अकलूज येथील एका व्यक्तीने, त्यांचे योगायोगाने भेटलेल्या तीन मित्रांना, कोहिनूर आईस्क्रीम अँड स्नॅक्स या ठिकाणी थंड खाण्यासाठी घेऊन गेले होते,यावेळी तिघांनी लस्सी घेतली व एकाने लिंबू सरबत सांगितला, परंतु कोहिनूर आईस्क्रीमवाले म्हणाले, इथे लिंबू सरबत मिळत नाही, असे म्हणल्यानंतर आईस्क्रीम सांगितले. आईस्क्रीम देताच, ते सदर ग्राहकाने निम्मे खाल्ले असता, आईसक्रीमच्या मध्येभागी त्यांना, मृत अवस्थेत माशी दिसून आली.ती माशी सर्वांनी पाहिली आणि स्वतः समोर गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीनेही पाहिली.
गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीने, कामगारास बोलविले आणि आईस्क्रीम मधील मृत माशी दाखवली. तो कामगार निःशब्द झाला आणि पटकन माशी आढळून आलेले ते आईस्क्रीम घेऊन गेला.
याचाच अर्थ आईस्क्रीम दुकानात स्वच्छतेचा अभाव असावा आणि हे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. म्हणून सदर आईस्क्रीम दुकानाची तपासणी होणे गरजेचे आहे,म्हणून सदर ग्राहकाने दिनांक 30.04.2026 रोजी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने अकलूज येथील कोहिनूर आईस्क्रीम व आनंदनगर येथील मे. तांबोळी डेअरी प्रॉडक्ट हे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या चौकशी जाळ्यात अडकले आहे.

No comments:
Post a Comment