सांगोल्यात वादळ वारा व वीज पडून घरांचे व शेतीचे नुकसान
सांगोला(कटूसत्य वृत्त):- दिवसभराचा उष्णतेचा त्रास त्यात विजेचा लपंडाव व आणि सायंकाळच्या वेळी अचानक सुटलेले वादळी वारे त्यातच विजांचा कडकडाट असा नित्यक्रम चालू असल्याने ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील तीन दिवसात सांगोला शहरासह तालुक्यातील सोनंद, जुनोनी, येडगेवाडी (महुद बुद्रुक), लोटेवाडी, सावे, चोपडी याभागात वादळी वारा व वीज पडून घरांचे, जनावरांच्या गोठ्याचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले असून सांगोला तहसीलकडून पंचनामे
करण्यात आले आहेत.
तालुक्यातील अनेक ठिकाणच्या घरांचे जनावरांच्या गोठ्याचे झाडा-झुडपांचे नुकसान झाले आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी खर्च करीत जपलेल्या आंबा, डाळिंब, केळीच्या बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये गजेंद्र केशव नागणे (येडगेवाडी, महुद बु.), प्रभाकर तुकाराम जावीर (सावे), उत्तम सुखदेव मोरे (नवी लोटेवाडी), शिवाजी ज्ञानेश्वर बाबर (जयराम मळा, चोपडी), धोंडीराम कांबळे (सोनंद) यांच्या घरावरील, जनावराच्या गोट्याववरील पत्रे उडून जाऊन व झाडावर वीज पडून
मोठे नुकसान झाले..
सांगोल्याचे सतीश मदने यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर वीज पडून भिंतीचा मोठा हिस्सा खाली उभा केलेल्या ट्रॅक्टरवरती पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
No comments:
Post a Comment