माढेश्वरी अर्बन बँकेकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

माढेश्वरी अर्बन बँकेकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार

 माढेश्वरी अर्बन बँकेकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार


मानेगाव (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माढेश्वरी अर्बन बँकेला सदिच्छा भेट दिली. यावेळी बँकेच्या वतीने चेअरमन अशोक लुणावत यांच्या हस्ते व बँकेचे संचालक तसेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री गोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या विविध निवडणुकांमधील अभूतपूर्व यशाबद्दल हा सत्कार करण्यात आल्याचे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री गोरे यांनी बँकेचा सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल पाहून बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले. माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माढेश्वरी अर्बन बँकेने विस्तारासह उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी माजी आमदार राजेंद्र राऊत, प्रा. शिवाजी सावंत, रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषद सभापती चेतन केदार पाटील, जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे, कृषी अधिकारी अनिल देशमुख, सरपंच मुन्नाराजे मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे, दीपक भोसले, नगरसेवक राजू गोटे यांच्यासह बँकेचे कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages