खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांना यश
अकलूज (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील वाकाव येथील रेल्वे लाईनवरील नागरिकांच्या सोयीसाठी अंडरपास (अंडरग्राऊंड मार्ग) निर्माण करण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने या कामाला मंजुरी दिली आहे.
यासंदर्भात मध्य रेल्वे, सोलापूर विभागाचे अपर मंडल रेल प्रबंधक यांनी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. वाकाव येथील 403/8-9 येथे पादचाऱ्यांसाठी सबवे बांधण्याचे काम PH-16 अंतर्गत मंजूर करण्यात आले असून या कामाचा अपेक्षित पूर्णत्व कालावधी मार्च 2027 पर्यंत असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
वाकाव परिसरातील नागरिकांना रेल्वे मार्ग ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला.
नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
.png)
No comments:
Post a Comment