लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 26, 2026

लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी.

 लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी.



 
अकलूज (कटूसत्य वृत्त):-माळशिरस तालुक्यातील गिरझणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते डॉ.धवलसिंह मोहिते- पाटील उपस्थित होते.    
           या कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी ग्रामस्थांचे वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साठे यांचे शुभहस्ते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा फेटा पुष्पहार व अण्णाभाऊ साठे यांचा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वह्या,पेन व पेन्सिलचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले व त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
         याप्रसंगी डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले,प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना एका वर्षात जवळपास ११०० शाळांना मंजुरी व बांधकाम करून शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठे काम केल्याचा उल्लेख केला आणि विद्यार्थ्यांना शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी व्यायाम आणि खेळांची आवड जोपासण्या बाबत मार्गदर्शन केले आणि मुलांना पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
        या कार्यक्रमासाठी हरिदास माने,भोजराज माने,काकासो माने, महादेव साठे,रमेश साठे,संजय माने,सागर देशमुख,दिपक पिंजारे, शंकर चव्हाण,विजय माने,रवी माने,सुनील माने, शिवाजी माने, बाळासो सोनवले, नेताजी काळकुटे,रामदास माने, गजानन माने,सचिन माने,शामराव पालकर, ज्योतीराम माने,शंकर वाघ,लक्ष्मण कुंभार,ग्रामसेवक नवले भाऊसाहेब,सरपंच सौ.गंगुबाई साठे,जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक,अंगणवाडी सेविका व मदतनीस,ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार संजय लोहकरे, कृष्णा लावंड,ग्रामस्थ व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रकाश कांबळे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages