आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 26, 2026

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

 आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व  कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी






पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आषाढी यात्रा कालावधीत ग्रामपंचायतींना साडेचार कोटी रूपये निधी देणेस मान्यता देणेत आली. ग्रामपंचायतींच्या अनुदानात १ कोटी रूपयांची वाढ करणेत आली आहे. 
 वारकरी यांना देणेत येणारे विविध कामांना मंजुरी आजच्या सर्वसाधारण सभेत देणेत आली.
जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज पंढरपूर येथे विठ्ठल  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात  घेणेत आली. या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य हे होते. या सभेस उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, माध्यमिक शिक्षणाधिकाकी सचिन जगताप प्रमुख उपस्थित होते. 
या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शना खाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभाग अंतर्गत भरगोस निधी वारकरी यांचे साठी दिले बद्दल अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार , पक्ष नेत्या रश्मी बागल , जि प सदस्य पृथ्वीराज माने, व्यंकटेश भालके, अतुल पवार, अजिनाथ देशमुख यांनी अभिनंदन करून आभार  मानले. 
*ग्रामपंचातींना वाढीव अनुदानाची मागणी*
. पालखी मार्गावरील सांगोला, माढा व बार्शी, मंगळवेढा व उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातून येणारे मार्गावरील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देणेची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी १ कोटी रूपयांची वाढ करणेत आले असल्याचे सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पुर्वी ८१ ग्रामपंचायतींना 3 कोटी 50 लोन रूपये अनुदान देणेत येत होते. या मध्ये १ कोटी रूपये वाढ करणेत आली आहे. आणखी १० ग्रामपंचायतींचा पालखी मार्गावरील ग्रामपंचायती मध्ये समावेश करणेत आला आहे. ग्रामपंचायत विभागाच्या अंतर्गत वारकरी स्वागत कमान व वारकरी यांना पायांना आराम फुटमसाजर च्या कामांना मंजुरी देणेत आली. मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र  (जर्मन हॅंगर), वारकरी यांच्या साठी शौचालय सुविधा व पालखी मार्गावरील स्वच्छता, स्नानगृह, पालखी तळांवर जोडणारे रस्ते, पिण्याचे पाण्याचे टॅंकर सुविधा, वारकरी यांचे साठी औषधे खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन या कामांनी एकमताने मंजुरी देणेत आली. 
असल्याचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सांगितले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पिण्याचे टॅंकर ची  निविदा सर्वात प्रथम  पुर्ण  केले बद्दल सिईओ कुशल जैन यांनी अभिनंदन केले. 
कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर व त्यांचे टीमने वेळेत निविदा पुर्ण केली आहे. 

*आमदार राजेंद्र राऊत यांचा अभिनंदनाचा ठराव..!*

विधान परिषदेचे आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांचे निवडी बद्दल जि प सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. जि प अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार व  सदस्यांनी एकमताने अभिनंदन केले.  

*सिईओ कुशल जैन यांची तात्पुरता..!*
वारकरी यांचे सुविधांसाठी पुणे, सातारा, सोलापूर यांचे सह तिन्ही  जिल्ह्यातील विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया व सुक्षंम नियोजन करून कामांना गती दिल्या बद्दल जि प सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सर्व नियोजना साठी बारकाईने लक्ष दिले आहे. पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, अधिक्षक तांबोळी , यांनी सर्वसाधारण सभेसाठीचे व्यवस्थेचे नियोजन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages