वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; उद्योजक अमर देशमुख यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 26, 2026

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; उद्योजक अमर देशमुख यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक

 वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; उद्योजक अमर देशमुख यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी (टें.) येथे शिराळ (टें.) गावचे सुपुत्र तसेच प्रगती ग्रुपचे सर्वेसर्वा उद्योजक आदरणीय श्री. अमर भैया देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, चार वह्या तसेच कंपास पेटीचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रगती ग्रुपचे मॅनेजर आदरणीय श्री. कैलास देशमुख सर, आदरणीय श्री. माशाळ सर तसेच आदरणीय श्री. सुधीर भाऊ बाचरे सर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
उद्योजक अमर देशमुख हे दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. सालाबादप्रमाणे ६ जानेवारी रोजी पत्रकार बांधवांचा सन्मान करून त्यांना वही व भेटवस्तू देण्याचा उपक्रमही ते सातत्याने राबवतात. त्याचप्रमाणे माढा तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप, शैक्षणिक साहित्य वितरण तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक उपक्रम त्यांनी यापूर्वीही यशस्वीपणे राबवले आहेत.
त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत नागरिक, पालकवर्ग तसेच विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी केलेले त्यांचे कार्य माढा तालुक्यात विशेष उल्लेखनीय मानले जात आहे.
या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाष बापू इंदलकर, जमाल काझी सर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages