अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कळंब तालुकाध्यक्षपदी साहित्यिक सोपान पवार यांची निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 26, 2026

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कळंब तालुकाध्यक्षपदी साहित्यिक सोपान पवार यांची निवड

अखिल भारतीय  मराठी साहित्य परिषदेच्या  कळंब तालुकाध्यक्षपदी साहित्यिक सोपान पवार यांची निवड 



(कटूसत्य वृत्त):-  कळंब विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख ,नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या कळंब तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.सोपान पवार यांनी अध्यापन कार्याबरोबरच शैक्षणिक, सामाजिक ,वृक्ष संवर्धन असे विविध कार्य केले आहे. महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित मराठी विषयाचे राज्यस्तर ,जिल्हास्तर ,तालुकास्तर ,मराठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य निवड, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण राज्यस्तर मास्टर ट्रेनर म्हणून कार्य, महाराष्ट्र शासन राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे पाठ्यपुस्तक निर्मिती सदस्य कार्यशाळेसाठी निवड, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे आयोजित नवोपक्रम स्पर्धेत राज्यस्तर, जिल्हास्तर ,तालुकास्तर  नवोपक्रमाची निवड, पारितोषिक प्राप्त ,निबंध लेखन स्वरूप आणि दिशा, निबंध लेखनाची प्रेरणा आणि नवदिशा, पारितोषिक प्राप्त गुणवंताची भाषणे ही पुस्तके प्रकाशित, शैक्षणिक लेख वृत्तपत्रात प्रसिद्ध, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मराठी परिषदांमध्ये शोधनिबंध प्रसिद्ध, सावित्रीबाई फुले गौरव ग्रंथात लेख प्रसिद्ध , दिवाळी अंकात कथा प्रसिद्ध , काव्यसंग्रहात कविता प्रसिद्ध , अनेक कवी संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून कार्य ,विविध विषयावर लेखन, अनेक शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचे मार्गदर्शन ,महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे शैक्षणिक साहित्य निर्मिती तालुकास्तर प्रथम क्रमांक, पारितोषिक प्राप्त ,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे लेखक कार्यशाळेसाठी निवड , राज्यस्तर जिल्हास्तर अनेक निबंधांना पारितोषिक व पुरस्कार प्राप्त , विविध कार्यक्रमांमध्ये निवेदक ,वृक्ष संवर्धन कार्य वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मानित  या शैक्षणिक , साहित्य लेखन विषयक वृक्ष संवर्धन कार्य अशा  कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे, राष्ट्रीय विश्वस्त ज्ञानेश्वर पतंगे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष परमेश्वर पालकर, मराठवाडा संघटक अशोक कुरुंद व इतर पदाधिकारी या समितीने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 32 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन धाराशिव येथे साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कळंब तालुकाध्यक्षपदी सोपान पवार यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages