मोहोळमध्ये रस्ते अतिक्रमण; वाहतूक कोंडी कायम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

मोहोळमध्ये रस्ते अतिक्रमण; वाहतूक कोंडी कायम

 मोहोळमध्ये रस्ते अतिक्रमण; वाहतूक कोंडी कायम

नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा इशारा



मोहोळ शहर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहरातील भाजी मंडई, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे, मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव, वाहतूक कोंडी तसेच जिल्हा परिषद शाळेच्या परिसराचे होत असलेले नुकसान या गंभीर प्रश्नांबाबत काँग्रेसच्या तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अंजली वरत्रे यांनी मोहोळ नगर परिषद प्रशासनाला निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दि. १९ जून रोजी मोहोळ नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

मोहोळ शहरातील मुख्य रस्त्यांवर भाजी विक्रेत्यांची वाढती अनधिकृत गर्दी होत असून तसेच मोकाट जनावरे यांच्या मुळे वेळा लेखी निवेदने देऊन तसेच उपोषण करूनही प्रशासनाने याप्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

सार्वजनिक हित, , विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांवर

जबाबदारी निश्चित करून तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून

अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.

जिल्हा परिषद शाळेचे कुंपण तोडल्याची घटना घडूनही संबंधितांवर प्रशासनाने तातडीने ठोस पावले

उचलली नाहीत तर १९ जून रोजी आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आल्याने मोहोळ नगर परिषद प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. आता प्रशासन या निवेदनाची कितपत दखल घेते याकडे नागरिकांचे लक्ष कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळेच्या गेटसमोर व परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत भाजी विक्रीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अंजली वरत्रे यांनी यापूर्वी अनेक लागले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages