भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिवसा फक्त २ तास वीज; शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 24, 2026

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिवसा फक्त २ तास वीज; शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध

 भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिवसा फक्त २ तास वीज; शेतकरी संघटनांचा तीव्र विरोध




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे जलसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला असून, उजनी धरण तसेच भीमा नदीवरील बंधाऱ्यांमधील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे. शेतकऱ्यांकडून होणारा अतिरिक्त पाणी उपसा रोखण्यासाठी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिवसा केवळ दोन ते तीन तासच वीजपुरवठा केला जात आहे. या निर्णयाला शेतकरी संघटनांनी विरोध दर्शविला असून, आमदार सुभाष देशमुख हेही राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार आहेत. दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार राबविला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

सोलापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी मानले जाणारे उजनी धरण सध्या उणे ३५ टक्के पातळीवर पोहोचले आहे. जून महिना संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी, खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून, वाढत्या उष्णतेमुळे पिकांना अतिरिक्त पाण्याची गरज भासत आहे.अशा परिस्थितीत महावितरणकडून दिवसा वीजपुरवठ्यावर निर्बंध आणि रात्री भारनियमन केले जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांमध्ये घरगुती आणि कृषी वीज जोडण्या एकाच फिडरवर आहेत. दिवसा वीजपुरवठा मर्यादित असल्याने काही शेतकरी सिंगल फेजद्वारे कृषिपंप सुरू करत आहेत. त्यामुळे फिडरवरील भार वाढत असल्याने संबंधित गावांमध्ये सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी सांगितले की, भीमा नदीकाठच्या बंधाऱ्यांमधून कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याकडे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने लक्ष देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच दिवसा दोन ते तीन तास वीजपुरवठा केला जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages