व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 6, 2026

व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा

 व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- व्ही.व्ही.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयआयटी मुंबईचे संशोधक डॉ. अनुज घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य व कॅम्पस संचालक डॉ. अरुण गायकवाड होते. यावेळी आय.ई.आय. सोलापूर चॅप्टरचे सचिव ओमप्रकाश दरक, संस्थेचे संचालक रोहन देशमुख, व्ही.व्ही.पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एस. एन. कुलकर्णी, व्ही.व्ही.पी. ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा. संतोष माने तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. संजय बुगडे यांनी प्रास्ताविकातून पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. मकरंद बुध्दे यांनी प्रमुख पाहुणे डॉ. अनुज घोरपडे यांचा परिचय करून दिला. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. अनुज घोरपडे, आय.ई.आय. सोलापूर चॅप्टरचे सचिव ओमप्रकाश दरक, संस्थेचे सचिव रोहन देशमुख तसेच इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रोहन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक स्तरावर जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. ओमप्रकाश दरक यांनी शाश्वत विकासासाठी पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याची गरज व्यक्त केली.
डॉ. अरुण गायकवाड यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. महाविद्यालय परिसरात १०० हून अधिक वृक्ष लागवड करण्याचा संकल्प व्यक्त करत विद्यार्थ्यांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी पर्यावरण संरक्षणासाठी जनसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचत, जलसंवर्धन, स्वच्छता, पुनर्वापर , वापरात कपात  आणि पुनर्चक्रण  यांसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे त्यांनी नमूद केले.प्रमुख पाहुणे डॉ. अनुज घोरपडे यांनी पर्यावरणीय आव्हाने, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन करताना पर्यावरण संरक्षणामध्ये तरुण पिढीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोडुगुपल्ली यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. संतोष माने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. संजय बुगडे तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अमोल (नाना) चव्हाण, संस्थापक चेअरमन डॉ. जी. के. देशमुख तसेच व्हाईस चेअरमन मधुकर कटकधोंड यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages