पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून संवर्धन करणे आवश्यक- संस्कृती सातपुते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 6, 2026

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून संवर्धन करणे आवश्यक- संस्कृती सातपुते

 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून संवर्धन करणे आवश्यक- संस्कृती सातपुते




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढीला सुरक्षित व आरोग्यदायी आयुष्य देण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी व्यक्त केले.
त्या सोलापूर जिल्हा परिषद येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. त्या पुढे बोलत असताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'एक पेड़ माँ के नाम 'या अभियानातून प्रेरणा घेऊन  सोलापूर जिल्हा परिषद येथे वृक्षारोपण केले आहे. यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष  दीपक वैद्य, उपाध्यक्ष  इंद्रजित पवार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, शिक्षण व आरोग्य सभापती  चेतनसिंह केदार-सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती  रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती अमृताताई वाघे, जिल्हा परिषद सदस्य सौ. शांभवीताई कल्याणशेट्टी यांच्यासह सर्व मान्यवर वर्ग अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages