संकेत गव्हाणे याची विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 6, 2026

संकेत गव्हाणे याची विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामसाठी निवड

 संकेत गव्हाणे याची विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामसाठी निवड  





माढा (कटूसत्य वृत्त):- केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत प्रोग्राम अंतर्गत खेल व गृह मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्रामसाठी मे महिन्यात राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन टेस्ट घेतली होती त्यामधून माढा तालुक्यातील शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथील संकेत बालाजी गव्हाणे यांनी 30 पैकी 29 गुण प्राप्त करून गुणवत्तेच्या जोरावर त्याची निवड हिमाचल प्रदेश येथे 3 ते 12 जून या कालावधीसाठी झाली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशातून या प्रोग्रामसाठी 21 ते 29 वयोगटातील 100 जण तर महाराष्ट्रातून 15 जणांची निवड झाली आहे.एका छोट्याशा गावातील तरुणाला गुणवत्तेच्या जोरावर देशपातळीवर काम करण्याचा बहुमान  मिळाला आहे त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

संकेत गव्हाणे याने माढा येथील सीबीएसई बोर्डाच्या आर्या पब्लिक स्कूलमधून 10 वी पर्यंतचे शिक्षण,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत बारामती येथे बीएससी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले असून तेथेच त्याने एनएसएस कोर्सही पूर्ण केला आहे.देशातील विविध भागातील तरुणांना देशाच्या सीमावर्ती गावातील लोकांचे राहणीमान,संस्कृती,आहार व पोशाख,व्यवसाय, त्यांच्या समोरील विविध आव्हाने, जीवनमान कसे आहे याची माहिती हवी व त्यावर काही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा विधायक प्रोग्राम केंद्र सरकारने हाती घेतला आहे. निवड झालेल्या तरुणांमधून 5 जणांची एक टीम तयार करून ती टीम सीमावर्ती भागातील खेडेगावात प्रत्यक्ष जाऊन पाहणी व माहिती घेणार आहेत.त्यांच्यासमवेत 1 अधिकारी व 1 सैनिक असणार आहे.या कालावधीत ते कुटुंब जे काही त्यांचे कौटुंबिक, सांस्कृतिक व व्यावसायिक कामकाज करेल त्यामध्ये या युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवून त्यांची संस्कृती,त्यांचे प्रश्न व समस्या आणि आव्हाने समजून घ्यायची आहे.या कालावधीत त्यांची संस्कृती व जीवनमान आणि आपली संस्कृती व जीवनमान यांची तुलनात्मक माहिती संकलित करायची आहे.जेणेकरून या माध्यमातून सीमावर्ती भागातील खेड्यांचा विकास व उपायोजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारला मदत होईल.या निवड झालेल्या सर्व तरुणांना या कालावधीत केंद्र शासनाच्या वतीने सर्व सेवा-सुविधा मोफत पुरविण्यात येणार आहेत.तो विठ्ठलवाडीचे माजी सरपंच बालाजी गव्हाणे यांचा मुलगा तर सोसायटीचे संचालक तथा द्राक्ष उत्पादक शेतकरी अशोक गव्हाणे व इतिहासाचे लेखक प्रोफेसर डॉ.किशोर गव्हाणे यांचा पुतण्या आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages