'लालपरी'तील दिव्यांग प्रवाशांच्या हक्कासाठी सोलापूरच्या मातीतील संघर्ष यशस्वी!
सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ धेडे यांच्या धडक पाठपुराव्यामुळे अखेर महामंडळ झुकले; संपूर्ण सोलापूर विभागात कडक आदेश जारी!
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग बांधवांना अनेकदा आपल्या हक्काच्या राखीव जागेसाठी करावा लागणारा संघर्ष आणि सहन करावी लागणारी उपेक्षा, याविरोधात सोलापूरचे सुपुत्र आणि खंबीर सामाजिक कार्यकर्ते वैजीनाथ औदुंबर धेडे (रा.मु.पो. कातेवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांनी पुकारलेला प्रशासकीय लढा अखेर यशस्वी ठरला आहे. वैजीनाथ धेडे यांनी पुराव्यांसह सादर केलेल्या निवेदनाची अत्यंत गंभीर दखल घेत, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सोलापूर विभागीय नियंत्रकांनी विभागातील सर्व ९ आगार व्यवस्थापक, चालक आणि वाहकांसाठी अत्यंत कडक आणि शिस्तभंगाची कारवाई करणारे ऐतिहासिक आदेश जारी केले आहेत. वैजीनाथ धेडे यांच्या या राज्यस्तरीय महत्त्वाच्या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🔴 ऑन-ग्राउंड परिस्थितीवर वैजीनाथ धेडे यांनी फिरवले आसूड!
एसटी महामंडळाचे कागदावर अनेक नियम आहेत, परंतु प्रत्यक्षात मैदानी पातळीवर (On-ground) त्यांची अंमलबजावणी शून्य होती. साधी बस, निमआराम, ई-शिवाई, शिवशाही, अगदी विना-वातानुकूलित शयनयान ते शिवनेरीपर्यंत सर्व बसेसमध्ये दिव्यांगांसाठी जागा राखीव असूनही, सामान्य प्रवासी जागा सोडत नव्हते आणि वाहकही टाळाटाळ करत होते. दिव्यांग बांधवांना सन्माना ऐवजी अपमानास्पद वागणूक मिळत होती. हा थेट त्यांच्या हक्कांवर गदा आणणारा प्रकार असल्यामुळे, वैजीनाथ धेडे यांनी थेट कागदपत्रांनिशी दि. ७ जून २०२६ रोजी एसटी प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आणि थेट कारवाईची मागणी केली.
🚌 एसटी प्रशासनाचे 'हे' ऐतिहासिक निर्णय; जे आता संपूर्ण राज्यासाठी पॅटर्न ठरतील:
वैजीनाथ धेडे यांच्या मागण्याचा स्वीकार करत सोलापूर विभागीय कार्यालयाने १५जून २०२६ रोजी
खालील सुचनांची काटेकोरपण अंमलबजावणी करण्यात यावी
१.रा.प. बसमध्ये दिव्यांग प्रवाशास उपलब्ध आसने ठळकपणे नमुद करण्यात यावीत.
२. आरक्षित आसनावर दिव्यांग आरक्षित असे फलक लावण्यात यावेत.
३. वाहकाने प्रवासादरम्यान दिव्यागं लाभार्थी यांना त्यांचे आरक्षित आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याबाबत सुचना प्रसारित करण्यात यावेत.
४. दिव्यांग प्रवाशानां बस मध्ये चढताना व उतरताना वाहकाने मदत करावी.
५. दिव्यांग प्रवाशांशी उध्दटपणे वर्तन केल्यास रा.प. कर्मचारी यांना शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. त्यांचा अहवाल विभागीय कार्यालयास पाठविण्यात यावा.
६. दिव्यागं प्रतिनिधीसह तकार निवारण समितीची स्थापना करण्यात यावी.
७. दिव्यागं आसन राखीव तसेच प्रवासात मदत करण्याबाबत सर्व चालक वाहक यांना प्रबोधन करण्यात यावे
रोज ड्युटीवर जाताना (Duty Allocation) प्रत्येक चालक-वाहकाला या नियमांची लेखी समज दिली जाईल.
🎯 "हा केवळ माझा लढा नव्हता, तर..." – वैजीनाथ धेडे
या मोठ्या यशानंतर आपली प्रतिक्रिया देताना वैजीनाथ धेडे म्हणाले की, "अपंग आणि दिव्यांग बांधवांना सुरक्षित, सन्मानकारक आणि सुखाचा प्रवास मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. हा लढा केवळ सोलापूर पुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील परिवहन सेवेने यातून धडा घेतला पाहिजे. प्रत्येक दिव्यांग प्रवाशाला त्याचा हक्क मिळेपर्यंत आमचा हा प्रशासकीय लढा असाच सुरू राहील."वैजीनाथ धेडे यांच्या या धडाकेबाज आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील वैजिनाथ धेडे यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहणार व खंबीरपणे सात देणार अशा विविध राजकीय पेक्षाने व सामाजिक चळवळीतील दिग्गजांनी आणि विविध दिव्यांग संघटनांनी पाठिंबा देत त्यांचे मनापासून आभार मानले असून, त्यांचे कौतुक केले व पुर्ण महाराष्ट्रभर कौतुक होत आहे

No comments:
Post a Comment