वाजली घंटा, भरले वर्ग; विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे पर्व - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

वाजली घंटा, भरले वर्ग; विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे पर्व

 वाजली घंटा, भरले वर्ग; विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवे पर्व

अंजनगाव उमाटे येथील शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; आमदार अभिजित पाटील यांची उपस्थिती



माढा (कटूसत्य वृत्त) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी संदेश दिला.

यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले, “लहानग्यांच्या डोळ्यांतील चमक, चेहऱ्यावरील कुतूहल आणि नव्या सुरुवातीची उत्सुकता पाहून मन आनंदित झाले. शिक्षणाची पहिली पायरी त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरणार असून, याच मुलांमधून उद्याचे सक्षम नागरिक घडणार आहेत.”

प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ते त्यांच्या पालकांना स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात आले. तसेच नव्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी विकास यादव, सरपंच माधुरी आदलिंगे, केंद्रप्रमुख फारूख शेख, ज्येष्ठ नेते सुनील पाटील, बाबासाहेब पारडे, गणेश उमाटे, आबासाहेब साठे, शिवाजी मुळे, अच्युत उमाटे, जावेद पठाण, अमोल उमाटे, रामहरी आदलिंगे, अनिल कोलगे, पोपट काशीद, दादा सय्यद, धनाजी ओव्हाळ, अल्ताफ पठाण, राहुल जाधव, संजय बोंगे, अक्षय शिंदे, अभिजित उबाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मिताली थोरे, उपाध्यक्षा प्रियंका कोलगे, मुख्याध्यापक कापसे, शिक्षक, कर्मचारी, पत्रकार, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नियमित शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी वातावरणात झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages