स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 16, 2026

स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

 स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

अक्कलकोटमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; नवागतांचे गुलाबपुष्प, शालेय साहित्य देऊन स्वागत



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त अक्कलकोट नगरपरिषद प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १ तसेच लायन्स शिशू व प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे प्रेमाने स्वागत करताना आनंद, उत्साह आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

नगरपरिषद प्राथमिक मराठी मुला-मुलींच्या शाळा क्रमांक १ येथे आयोजित कार्यक्रमास नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी प्रमुख उपस्थित होते. यावेळी स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षण मंडळ सभापती अपर्णा सिद्धे, नगरसेविका अमृता शिंदे, नगरसेवक नावेद डांगे, शिक्षकवृंद व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नवागत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश, शालेय बॅग तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य उज्ज्वल व्हावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.

दरम्यान, लायन्स शिशू व प्राथमिक शाळेमध्येही प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्याध्यापिका जगदेवी कडगंची, महानंदा निलगार व शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय खोबरे, स्कूल कमिटीचे चेअरमन राजेंद्र हत्ते, सचिव शिवशरण खुबा आणि विठ्ठल तेली उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भारावून गेला. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी यशाची नवी शिखरे गाठावीत, अशा शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages