महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता नागरिकांना या उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. कारण, imdMumbai च्या अंदाजानुसार पुढील काही दिवस महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2 जून रोजी चे हवामान
पावसाचा येलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (40- 50 किमी तास) येण्याची शक्यता आहे.
पावसाचा ऑरेंज अलर्ट- कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती या जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (वेग 50-60 किमी प्रति तासपर्यंत पोहोचण्याची शक्यता) पावसाची शक्यता आहे.
3 जून रोजी चे हवामान
पावसाचा येलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशीव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (40- 50 किमी तास) येण्याची शक्यता आहे.
4 जून रोजी चे हवामान
पावसाचा येलो अलर्ट : पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (40- 50 किमी तास) येण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment