सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या हस्ते सभासद स्मार्ट कार्डाचे वितरण
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर- अकलूज या साखर कारखान्याच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज शुक्रवार दि.०५/०६/२०२६ रोजी शेती विभागीय कार्यालय, लवंग येथे वृक्षारोपण, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान (ए. आय.), ऊस शेती चर्चासत्र व सभासद स्मार्ट कार्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सदरचा कार्यक्रम अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक तथा संचालक सयाजीराजे मोहिते पाटील यांचे शुभहस्ते संपन्न झाला.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह मोहिते-पाटील माजी उपमुखमंत्री, महाराष्ट्र राज्य व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर चालू आहे.
सयाजीराजे मोहिते- पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना पर्यावरणाचे संरक्षणाकरिता लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले.
शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणे ही काळाची गरज असल्याचे सांगून कारखान्याने प्रायोगिक तत्त्वावर सभासदांना स्मार्ट कार्डचे वितरण केले असून त्याचे सभासदांना होणारे फायदे, वेळेची बचत, त्वरित माहिती मिळणे याबाबत सभासद व शेतकरी यांना माहिती दिली.
सदर कार्यक्रमास शंकरराव माने-देशमुखसाहेब, व्हॉईस चेअरमन, कारखान्याचे आजी माजी संचालक, डॉ.समाधान सुरवसे व डॉ.तुषार शितोळे, शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे, डॉ.तुषार पोळ, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, सभासद, शेतकरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक सुहास यादव व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
.jpg)
No comments:
Post a Comment