अन्नछत्र मंडळाचा भव्य उपक्रम; ७२ कोटींच्या महाप्रसादगृहावर उभारली जाणार ५१ फूट स्वामी मूर्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 19, 2026

अन्नछत्र मंडळाचा भव्य उपक्रम; ७२ कोटींच्या महाप्रसादगृहावर उभारली जाणार ५१ फूट स्वामी मूर्ती

 अन्नछत्र मंडळाचा भव्य उपक्रम; ७२ कोटींच्या महाप्रसादगृहावर उभारली जाणार ५१ फूट स्वामी मूर्ती




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले नेतृत्व व संकल्पनेतून न्यासाकडून साकारत असलेल्या पाच मजली वातानुकूलित महाप्रसादगृहाच्या शेवटच्या मजल्यावर विराजमान होणाऱ्या ५१ फूट उंच श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीच्या निर्मिती कार्याचा शुभारंभ पुणे येथे संपन्न झाला आहे.

या ऐतिहासिक प्रकल्पासाठी मूर्ती निर्मितीची जबाबदारी स्वीकारलेल्या पिनाक आर्ट स्टुडिओ आणि प्रशांत खेडकर आर्ट क्रिएशन प्रा. लि.पुणै यांच्या कार्यस्थळावर शुभारंभ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट चे कार्यकारी अध्यक्ष  अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

अन्नदान, सेवाभाव आणि अध्यात्म याबरोबरच वसुंधरेची जपणूक यांचा संगम असलेल्या या प्रकल्पाच्या शेवटच्या मजल्यावर साकारली जाणारी ५१ फूट उंच श्री स्वामी समर्थांची मूर्ती भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि प्रेरणेचे केंद्र ठरणार आहे.
दररोज हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या या पाच मजली वातानुकूलित महाप्रसादगृहामुळे न्यासाचया सेवाकार्यात आणखी एक मानाचा तुरा खवणारा आहे.
स्वामीभक्तांच्या सहकार्याने साकारत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर अक्कलकोटच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणारा तसेच देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी श्रद्धा, सेवा आणि स्वामीभक्तीचे प्रेरणास्थान ठरणार आहे.

एक दृष्टिक्षेप- नव्याने बांधण्यात येणाऱ्या नियोजित महप्रसादगृहाच्या वास्तूवर
          नियोजित ५ मजली महाप्रसादगृहाची इमारत ही भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित् असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल.  
या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
सदर इमारतीचे बांधकाम नोव्हेंबर २०२४ पासून सुरु झाले असुन  ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे.
या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ७२ कोटी, इतका अपेक्षित आहे. सदर इमारतीस नगरपालिकेची रीतसर बांधकाम परवानगी घेतली आहे आणि या नियोजित भव्य ५ मजली महाप्रसादगृह इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages