नशामुक्त चालक अभियान' अंतर्गत चालकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 27, 2026

नशामुक्त चालक अभियान' अंतर्गत चालकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ

 नशामुक्त चालक अभियान' अंतर्गत चालकांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य आणि आयुष इन्स्टिट्यूट व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने "विकसित भारत की पहचान – नशामुक्त चालक अभियान" या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व चालक बांधव, पदाधिकारी व मान्यवरांनी व्यसनमुक्त राहण्याची, इतरांनाही व्यसनापासून दूर ठेवण्याची तसेच सुरक्षित व जबाबदार वाहनचालक म्हणून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेतली.
यावेळी व्यसनाचे आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर होणारे दुष्परिणाम, रस्ते अपघातांमध्ये व्यसनाची भूमिका तसेच व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसनाच्या सुविधांबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांची निवड सभा देखील पार पडली. उपस्थितांनी नशामुक्त समाज आणि सुरक्षित वाहतुकीसाठी सातत्याने जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमाद्वारे चालक बांधवांमध्ये व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक संदेश पोहोचवून समाजात सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद,आयुष इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संदीप तांबारे, मृणालिनी मोरे, ॲड द्वारका देवळे,प्रदीप शिंगे व मोठ्या संख्येने पदाधिकारी व चालक बांधव उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages