अभिनव सामाजिक संस्थेतर्फे बुधवारी सर्वधर्मीय वधू-वर सूचक मेळावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अभिनव सामाजिक संस्था, सोलापूर यांच्या वतीने सर्वधर्मीय अविवाहित तरुण-तरुणींसाठी वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन बुधवार, दि. २४ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत समाजकल्याण केंद्र हॉल, रंगभवन, सोलापूर येथे होणार असल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा मिनल दास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्याचे उद्घाटन समाजातील ज्येष्ठ समाजसेवक व या क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. उच्चशिक्षित, व्यावसायिक, नोकरदार तसेच विविध क्षेत्रांतील विवाह इच्छुक तरुण-तरुणी आणि त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर आणून संवाद साधता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मेळाव्यादरम्यान वधू-वर व त्यांच्या पालकांना शिक्षण, नोकरी, आवडीनिवडी, अपेक्षा आणि भविष्यातील नियोजन याबाबत प्रत्यक्ष चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. सर्वधर्मीय सहभागामुळे सामाजिक सलोखा वाढण्यासह प्रगतीशील विचारांची देवाणघेवाण होण्यास मदत होणार असल्याचे मिनल दास यांनी सांगितले. मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींनी अथवा पालकांनी ८२६३००८९१३ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस शाम कदम, संभाजीराजे भोसले, अनिता वाघमारे आणि संजीवनी सलबत्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment