नातेपुते महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून प्रतापसिंह मोहिते पाटील यांची जयंती साजरी
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील,यांची जयंती निमित्त महाविद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली.त्यानिमित्त महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यावतीने परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले, ग्रामीण रुग्णालय नातेपुते व शहरातील विविध रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळे वाटप करण्यात आली, महाविद्यालयातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा.डॉ.दत्तात्रय मगर, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज,यांनी लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे जीवन कार्य व सध्याची राजकीय परिस्थिती याविषयी मार्गदर्शन केले.पप्पासाहेब हे धाडसी मनमिळाऊ नेते होते,दिलेला शब्द पाळणारे असे महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी होते,त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारण मोठ्या प्रमाणात केले.सामान्य कार्यकर्त्याला राजकारणात आणून मोठी पदे दिली.पप्पासाहेब यांनी आपल्या कारकिर्दीत शैक्षणिक,सामाजिक,कृषी, सहकार,राजकीय,धार्मिक इ.सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला.पप्पासाहेबांनी केलेले कार्य कधीही विसरणारे नाही असे मत व्याख्याते प्रा.डॉ.दत्तात्रय मगर यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भगवानराव साळुंखे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.डॉ.बाळासाहेब निकम, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजाभाऊ साठे,आभार प्रा. सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.उत्तम सावंत,प्रा.बापूराव वाघमोडे,सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वयंसेवक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment