छत्रपती शाहू महाराज जयंतीचे निमित्त अभिवादन सोहळा- - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 30, 2026

छत्रपती शाहू महाराज जयंतीचे निमित्त अभिवादन सोहळा-

 छत्रपती शाहू महाराज जयंतीचे निमित्त अभिवादन सोहळा-

-सह्याद्री बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने  उद्योग रत्न  पुरस्कार दिनेश लोंढेना प्रदान-
फोटो-दिनेश लोंढेना उद्योग रत्न  पुरस्कार प्रदान करताना माजी आ.धनाजीराव साठे सह अन्य मान्यवर 





माढा  (कटूसत्य वृत्त):-  छत्रपती  राजर्षी शाहू महाराजांनी अठरा पगड जातीमधील मुलांना शिक्षणा शिवाय समाजाचा विकास अशक्य आहे.हे ध्यानी घेऊन त्यांनी शिक्षणाची दारे खुली करुन शैक्षणिक क्रांती केली. असे मत माजी आ.धनाजीराव साठे यांनी व्यक्त केले.

छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीनिमित्त   माढ्यातील   फक्त सह्याद्री बहुउद्धेशीय संस्थेच्या वतीने  शाहु महाराज अभिवादन सोहळा पार पडला.या कार्यक्रमात 
प्रमुख पाहुणे म्हणुन माजी आ.साठे बोलत होते.प्रारंभी शाहु महारांजाना मान्यवरांच्या उपस्थितीत  पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.विचार मंचावर विधीज्ञ डाॅ.श्रीरंग लाळे,दिपक जगताप,बप्पा कन्हेरे,दत्ताजी शिंदे 
आदी उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या वतीने यंदाचा   २०२६ चा  "सह्याद्री उद्योग रत्न" पुरस्कार उद्योग क्षेत्रात शुन्यातुन विश्व निर्माण केलेल्या  चिंचोली  मधील दिनेश लोंढे यांना  प्रदान करण्यात आला.
संस्थे मार्फत राबवण्यात येणार्या सामाजिक उपक्रमाची माहिती अध्यक्ष दत्ताजी शिंदेनी प्रास्ताविकातून दिली.माजी.आ.साठे पुढे म्हणाले, १९१७ मध्ये कोल्हापुरात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा लागू केला. गोरगरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात राहता यावे, म्हणून त्यांनी मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा विविध जातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करुन ज्ञानाची विद्यापिठ उभा केली.अॅड.श्रीरंग लाळे म्हणाले,
शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी आणि जातिभेद नष्ट करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. प्रशासनात मागासलेल्या घटकांना प्रतिनिधित्व मिळाले.आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा कायदाही त्यांनी केला.यावेळी संस्थे मार्फत राबवण्यात येणार्या ग्राहक सन्मान योजनेचे बक्षिस वितरण पार पडले.यावेळी शारदा शिंदे,धनश्री शिंदे,श्रीकांत काशीद,रानबा कदम,जयदीप शिंदे,राहुल पडदुणे,सुहास लठ्ठे,औदुबर पवार,प्रमोद जगताप,यश जाधव,श्री.भिसे,सार्थक  शिंदे आदी उपस्थित होते.बंडु पवार यांनी जिजाऊ वंदना गायन केली.श्रीकांत काशिद यांनी  सुत्रसंचलन तर संदीप शिंदेनी आभार मानले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages