आर्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- विठ्ठल शिक्षण प्रसारक मंडळ, निमगाव संचलित आर्या कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णी येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी 2026 परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.
डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या निकालामध्ये जयमाला बाबर हिने ८१.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्राची गोमे हिने ७८.३० टक्के गुणांसह द्वितीय, तर राधिका पवार हिने ७७.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
तसेच डी. फार्मसी द्वितीय वर्षामध्ये निखिल शिंदे याने ७६.४६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. निकिता शिंदे हिने ७३.६४ टक्के गुणांसह द्वितीय, तर दिपाली मुटकुळे हिने ७१.९१ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला.
या यशस्वी निकालामुळे महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, महाविद्यालय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रणिता शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल पालक व परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

No comments:
Post a Comment