कंटेनरमधून एसी चोरी करणारी टोळी जेरबंद; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 27, 2026

कंटेनरमधून एसी चोरी करणारी टोळी जेरबंद; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

 कंटेनरमधून एसी चोरी करणारी टोळी जेरबंद; १०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त




मोहोळ  (कटूसत्य वृत्त):- मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून एअर कंडिशनर (एसी) संच चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत केलव्हीनेटर कंपनीचे २८ एसी संचांसह सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त** करण्यात आला असून, तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६२९/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल व फरार आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या पथकाने तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलीस अंमलदार मोहन मनसावाले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टाकळी सिकंदर येथील कारखाना वसाहतीत छापा टाकण्यात आला. तेथे संशयित **दीपक बाबुलाल साळुंके (वय ४७), शहाजी पठाण गायकवाड (वय २३) आणि प्रदीप रमेश चिंचकर (वय २६)यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीसांनी दीपक साळुंके यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडची तपासणी केली असता तेथे **केलव्हीनेटर कंपनीचे २८ एसी संच** आढळून आले. या मालाबाबत मालकीचे कोणतेही वैध कागदपत्र आरोपींकडे नव्हते. सखोल चौकशीत आरोपींनी ३० एप्रिल ते १ मे २०२६ दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथून कोची (केरळ) येथे जाणाऱ्या मालवाहू आयशर वाहनाच्या चालकासोबत संगनमत करून वाहनावरील सील तोडत कंटेनरमधून हे एसी संच चोरल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी १० लाख ५० हजार रुपयांचे २८ एसी संच जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, हेडकॉन्स्टेबल मोहन मनसावाले तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages